मला मोकळं सोडा
Set me Free
'मला मोकळं सोडा' या गोष्टीतील गोपीकडे 'ट्विटी' नावाचा एक पक्षी होता जो त्याने पिंजऱ्यात ठेवला होता. गोपीच्या शेजारी राहणाऱ्या रामाला ट्विटीने मुक्त व्हावे असे वाटत होते. त्यामुळे रामा ट्विटीला "पिंजऱ्याचे दार उघडा आणि मला मुक्त करा." असे म्हणायला शिकवितो. हे शिकण्यासाठी ट्विटीला थोडा वेळ लागतो; पण एके दिवशी ट्विटी हे शब्द बोलतो. ते ऐकून गोपीला राग येतो आणि तो पिंजऱ्याचे दार उघडतो. ते पाहताच ट्विटी आनंदाने उडून जातो.