बारीक मांजर आणि जाड मांजर

The Lean Cat and the Fat Cat

'बारीक मांजर आणि जाड मांजर' या गोष्टीत एक बारीक मांजर एका म्हाताऱ्या स्त्रीसोबत रहात असे. एके दिवशी बारीक मांजरीला एक जाड मांजर दिसले. त्या जाड मांजरीला अन्न कुठे मिळत असेल, याबाबत बारीक मांजरीला उत्सुकता वाटू लागले. यावर जाड मांजरीने ती राजाच्या महालातून कशा प्रकारे अन्न चोरते, याविषयी सांगते आणि ती बारीक मांजरीसोबत येण्याची तयारी दाखविते. म्हाताऱ्या स्त्रीने याबद्दल इशारा देऊनही बारीक मांजर जाण्यास तयार होते. राजाच्या टेबलावरून अन्न चोरताना बारीक मांजर पकडली जाते आणि राजाच्या सैनिकांकडून ठार मारली जाते.