एक बुद्धू गाढव

The Unwise Donkey

'एक बुद्धू गाढव' ही गोष्ट एक आळशी गाढव आणि मिठाचा व्यापारी यांची आहे. एकदा त्या व्यापाऱ्याने मीठ खरेदी केले आणि त्या गाढवाच्या पाठीवर लादले. घरी परतताना त्यांना वाटेत एक ओढा लागला. ओढा पार करताना चुकून त्या गाढवाचा पाय घसरून ते पाण्यात पडले. त्यातून बाहेर येताना त्या गाढवाच्या पाठीवरील ओझे थोडेसे हलके झाले. याची जाणीव झाल्यावर ते गाढव पाठीवरील ओझे हलके करण्याच्या हेतूने दरवेळी मुद्दामहून ओढ्यात पडू लागले. ही बाब व्यापाऱ्याच्या लक्षात आल्यावर त्याने एके दिवशी मिठाऐवजी कापूस खरेदी करून गाढवाच्या पाठीवर लादले. यावेळीही गाढवाने तीच युक्ती वापरली पण यावेळी त्याच्या पाठीवरील ओझे हलके ना होता अधिक जड झाले. आळशीपणा हा वाईटच असतो, ही शिकवण आपल्याला या मजेशीर गोष्टीतून मिळते.

Login to Read Now