बेडूक आणि साप
Handsome and Theodore
एकदा एका विहिरीत राहणारा थिओदोर नावाचा बेडकांचा राजा त्याच्या नातेवाईकांना कंटाळला होता. एके दिवशी तो सुंदर नावाच्या एका सापाची मदत घेतो. साप विहिरीत उतरून राजाच्या सर्व नातेवाईकांना खाऊन टाकतो. आपल्याला आणखी भूक लागली आहे आणि यापुढे आपल्याला विहिरीतच रहायचे आहे, असे सापाने राजाला सांगितल्यावर राजाला भीती वाटू लागते. मी तुझ्यासाठी आणखी बेडूक घेऊन येतो, असे खोटे सांगून तो तिथून पळ काढतो. थिओदोर राजाचा जीव वाचतो की तो सापाचे भक्ष्य ठरतो, हे या गोष्टीत वाचा.