पिसू आणि ढेकूण
Leap Creep
एका राजवाड्यात एक ढेकणी तिच्या कुटुंबासह राजाच्या बिछान्यात रहात असते आणि राजाचे रक्त पीत असते. एक पिसू तिथे आल्यावर राजाचे रक्त पिऊ द्यावे, अशी ढेकणीला विनंती करते. ढेकणी नाईलाजास्तव तयार होते पण राजाला हळू चावण्याविषयी पिसूला बजाविते. मात्र, पिसू राजाला जोरात चावते आणि त्यामुळे राजाला खूप वेदना होऊन तो चिडतो. प्रचंड वेदनेमुळे राजाला जाग येते. ढेकणीच्या कृतीचे पुढे काय दुष्परिणाम होतात, हे 'पिसू आणि ढेकूण' गोष्टीत वाचा.