बोका, मुंगूस, आणि छोटुकला ससा
The Cat, the Rabbit and the Weasel
'बोका, मुंगूस, आणि छोटुकला ससा' या गोष्टीत एक दयाळू ससा जंगलामध्ये एक स्वच्छ आणि नीटनेटक्या घरात रहात असे. त्याच्या अनुपस्थितीत एक मुंगूस त्याच्या घरात शिरते. जेव्हा ससा घरी आला तेव्हा त्याने मुंगसाला त्याच्या बिछान्यावर झोपलेले पाहिले. काही केल्या मुंगूसही ती जागा सोडण्यास तयार नव्हते. शेवटी दोघे यावर तोडगा काढण्यासाठी एका मांजरीला बोलावितात. ती दुष्ट मांजर त्यांचे भांडण ऐकून घेण्याचे ढोंग करते आणि उलट त्या दोघांवरच हल्ला करते. मग स्वतः सश्याच्या घरात आरामात राहू लागते. या गोष्टीचे तात्पर्य: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ...!!!