सोनेरी हंस

The Golden Swan

एकदा, सोनेरी पंख असलेला एक सुंदर हंस तलावात राहत होता. त्या तलावाजवळ एक गरीब महिला तिच्या दोन मुलींसह राहत होती. त्याने गरीब महिलेचे दुःख पाहिले आणि तिला आपली सोनेरी पिसे देऊन मदत करण्याचा विचार केला. लवकरच, महिला एक आरामदायी जीवन जगू लागली, परंतु काही काळानंतर, ती लोभी झाली आणि तिने हंसाची सगळी पिसे मिळविण्यासाठी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे हंसाला राग आला आणि तो म्हणाला की तो कधीच परत येणार नाही. महिलेला तिची चूक उमगली पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.