मूर्ख बकरी
                                 The Foolish Goat
                              
                              'मूर्ख बकरी' या गोष्टीमध्ये एक तहानलेला कोल्हा एका विहिरीत पडतो. तो एका शेळीला विहिरीतील पाणी खूप चवदार आहे असे खोटे सांगून शेळीला विहिरीत उडी मारायला लावतो. त्या शेळीच्या मदतीने तो विहिरीतून बाहेर येतो. विहिरीत उडी मारण्यापूर्वीच विचार करायला हवा होता, असे शेळीला म्हणून तो तिला विहिरीत सोडून निघून जातो. या गोष्टीचे तात्पर्य म्हणजे कृती करण्यापूर्वीच माणसाने विचार केला पाहिजे.
 
                                 




