गोठयामधील काळवीट
The Stag in the Stable
'गोठयामधील काळवीट' या गोष्टीत आपल्याला शिकाऱ्यांच्या पाठलागापासून स्वतःची सुटका करणारे आणि गोठ्यात जाऊन लपणारे एक काळवीट भेटते. मात्र, इथे एक समस्या निर्माण होते. त्या काळवीटाचे मोठे पाय बाहेर येत असतात! एक मदतशील बैल त्या काळवीटाला धोक्याची सूचना देतो, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. जेव्हा त्या गोठ्याच्या मालकाला त्या काळवीटाचा पत्ता लागेल, तेव्हा पुढे काय होईल? लपणे, मैत्री आणि लपायच्या जागेपेक्षा आपण मोठे असल्यास काय घडू शकते, याबाबत जाणून घेण्यासाठी ही गंमतीशीर गोष्ट जरूर वाचा.