ब्राह्मण आणि कोल्हा
The Brahmin and the Fox
'ब्राह्मण आणि कोल्हा' या गोष्टीतील कोल्हा जंगलाचा रस्ता विसरतो. त्याला एक ब्राह्मण भेटतो. कोल्हा त्याला जंगलाचा रस्ता दाखविण्याची विनंती करतो आणि त्या बदल्यात त्याला बक्षीस देण्याचे आमिष दाखवितो. भोळाभाबडा ब्राह्मण त्याला मदत करण्यास तयार होतो. जेव्हा कोल्हा जंगलाच्या जवळ पोहोचतो, तेव्हा ब्राह्मण त्याला बक्षिसाबद्दल विचारतो. मात्र कोल्हा केवळ जंगलात जाण्याच्या उद्देशानेच ब्राह्मणाशी बक्षिसाबद्दल खोटे बोललेला असतो. या गोष्टीचे तात्पर्य म्हणजे धूर्त लोकांवर कधीही विश्वास ठेऊ नये.