विंचू आणि कासव

The Scorpion and the Tortoise

ही गोष्ट आहे एका गर्विष्ठ विंचवाची आणि एका दयाळू कासवाची, जे मित्र होते. एके दिवशी कासव आपले घर सोडून जवळच्या जंगलात जाण्याचा निर्णय घेतो. विंचूही सोबत यायचे ठरवतो. जंगलात जाताना त्यांना नदी पार करायची होती. कासव हा विंचवाला नदीच्या पार पोहून नेण्यासाठी आपल्या पाठीवर बसू देतो. अचानक कासवाला आपल्या पाठीवर वेदना जाणवते. विचारल्यावर त्याला कळते की विंचू आपल्या नांगीने त्याच्या कवचाला टोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कासवाला राग येतो आणि तो त्याला नदीत ढकलून देतो.