कोल्हा, कोंबडी आणि ढोल

The Fox the Hen and the Drum

एक भुकेलेला कोल्हा अन्नाच्या शोधात असतो पण त्याच्या हाती काहीच लागत नाही. तोच एक कोंबडी त्याच्या नजरेस पडते. तो कोंबडी पकडण्याचा प्रयत्न करतो पण त्याला झाडावरून एक मोठा आवाज ऐकू येतो आणि त्याला वाटतं, की कदाचित तिथे आणखी एक पक्षी असेल. तो उत्साहित होऊन झाडावर चढतो, आणि पाहतो तर काय, तो आवाज फांद्यांमध्ये अडकलेल्या एका ढोलामुळे येत असल्याचे त्याला कळते. ही कथा हावरेपणाबद्दल धडा शिकवते.