गावठी उंदीर आणि शहरी उंदीर

The Country Mouse and the Town mouse

'गावठी उंदीर आणि शहरी उंदीर', ही वेगवेगळ्या परिस्थितीतील दोन उंदरांची गोष्ट सांगते. गावठी उंदीर शहरी उंदराचे स्वागत करतो आणि त्याला खाऊ घालतो. पण, शहरी उंदीर हा गावठी उंदराला चांगले अन्न देण्याचे वचन देऊन, शहरात येण्यास त्याचे मन वळवतो. शहरात, त्यांना शानदार जेवण मिळते पण एक भयानक मांजरसुद्धा भेटते. ही गोष्ट ऐषोआरामापेक्षा समाधानाचे महत्त्व स्पष्ट करते.