वाघाचे कातडे पांघरलेले गाढव
The Donkey in a Tiger Skin
'वाघाचे कातडे पांघरलेले गाढव' या गोष्टीतील कंजूष धोबी त्याच्या गाढवाला पोटभर खायला घालत नसे. एके दिवशी तो धोबी एका शेतकऱ्याला फसविण्यासाठी गाढवाला वाघाचे कातडे पांघरतो. त्याला बघून शेतकरी घाबरतो आणि वाघाला त्याच्या शेतातील पीक खाऊ देतो. मात्र, सरतेशेवटी शेतकऱ्याला कळून चुकते की, तो वाघ नसून वेष बदललेले गाढव आहे. चिडलेला शेतकरी त्या गाढवाला कोणतीही दयामाया न दाखविता बेदम बदडून काढतो. या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की, सत्य फार काळ लपून रहात नाही आणि प्रामाणिकपणा नेहमीच चांगला असतो.